logo

सुरेवानी येथे वाघाचा जनावरांवर हल्ला.. बडेगाव जि.प. सर्कलचे अनेक गाव वाघोबाच्या भितीत ?

सिरोंजी :- सावनेर तालुक्यातील बडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील खुबाळा , रिसाळा , बडेगाव , महारकुंड , सुरेवानी , सिंरोंजी व नागलवाडी या गावांना लागुन महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात वाईल्ड लाईफ संरक्षण अंतर्गत विविध जंगली जनावरांना या प्रकल्पाच्या क्षेत्रात ठेवण्यात आले आहे . परंतु जंगली जनावरांची शिकार खाण्याची व पाणी पिण्याची योग्य सोय होत नसल्याने जंगली जनावर गावाच्या परिसरात व शेतीकडे शिकारीकरिता येत असतात व पाळीव गायी , बैल , वासरे , व बक-यांची शिकार करत असतात. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक नुकसाना सोबतच जिव जाण्याची भिती ही निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी महाराष्ट्र वन मंत्रालय व प्रशासनाला यावर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

312
9324 views